"आर्थिक साक्षरतेवर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अग्रणी कार्यशाळा संपन्न"
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत, न्यू कॉलेज क्लस्टर अंतर्गत, IQAC व वाणिज्य विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर यांचे मार्फत “आर्थिक साक्षरतेद्वारे नागरिकांचे सशक्तिकरण ” या विषयावर एक दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचे औचित्य साधून " *आर्थिक साक्षरता* " या विषयावरती भित्तिपत्रकाचे प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. या भितीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यशाळेची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. कार्यशाळेचे उद्धघाटन महाविद्यालयाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात माननीय प्राचार्य सरांनी आजच्या काळात वित्तीय साक्षरतेची गरज आहे व विद्यार्थ्यांनी वित्तीय बाबींसंदर्भात ज्ञान घेऊन आपले आर्थिक समज वाढवावी असे आवाहन केले.कार्यक्रमासाठी न्यू कॉलेज, लीड कॉलेज क्लस्टरचे चेअरमन डॉ. व्ही. एम. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी IQAC समन्वयक डॉ.आर. डी. मांडणीकर, सह समन्वयक डॉ.ए.बी.बलुगडे तसेच महाविद्यालयामधील प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे आभार कॉमर्स विभागातील प्रा. डॉ. एम. ए. शिंदे यांनी मानले. कार्यशाळा तीन सत्रामध्ये पार पडली यामध्ये पहिल्या सत्रामध्ये न्यू कॉलेज येथील प्राध्यापक डॉ. ए. जी. सूर्यवंशी यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्व यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आर्थिक साक्षरता अर्थ, महत्व त्याचबरोबर बँकांमधील गुंतवणूक त्याचबरोबर बँकांच्या ठेवीचे व कर्जाचे नियोजन कशा पद्धतीने करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. सरांची ओळख डॉ.सी. के. पाटील यांनी करून दिली व आभार प्रा. उत्तम मोरस्कर यांनी मानले. दुसऱ्या सत्राचे साधन व्यक्ती श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यनामध्ये वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन केले, त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये वैयक्तिक आर्थिक नियोजनाचे महत्त्व, गुंतवणुकीचे विविध मार्ग, शेअर मार्केट मधील विविध गुंतवणुकीचे पर्याय, विम्याचे महत्त्व व निवृत्ती नियोजन या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. सरांची ओळख प्रा. सौ. सायली पाटील यांनी करून दिली व आभार प्रा. कुमारी सुमन लोहार यांनी मानले. शेवटच्या सत्राचे साधन व्यक्ती कोल्हापूर मधील गुंतवणूक सल्लागार श्री नितीन पाटील हे होते त्यांनी आपल्या व्याख्यानात आर्थिक फसवणूक म्हणजे काय, आर्थिक फसवणूक कोणकोणत्या मार्गाने होते व या पासून आपला बचाव कसा करावा या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. सरांची ओळख प्रा. सौ. अस्मिता इनामदार यांनी केली व या सत्राचे आभार प्रा. गजानन नाईक यांनी मानले. समारोपाचे सत्र महाविद्यालयातील प्रबंधक श्री रवींद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी कॉमर्स विभागातील प्राध्यापिका डॉ. सी. के. पाटील यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला. यावेळी वेगवेगळ्या महाविद्यालयामधून आलेल्या विद्यार्थी व प्राध्यापक यांनी कार्यशाळे संदर्भात आपला अभिप्राय नोंदवला व कार्यशाळेचा विषय, कार्यशाळेचे नियोजन यासंदर्भात समाधान व्यक्त केले. कार्यशाळेचे आभार प्रा. सौ. उज्वला पाटील यांनी मानले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कॉमर्स विभागातील प्रा. सौ. सौजन्या नागन्नावर, सौ एम. आय. मुजावर व सौ अस्मिता इनामदार यांनी केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष कांबळे यांनी काम पाहिले. ही कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी महाविद्यालयातील सर्वच घटकांचे सहकार्य लाभले. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या कार्यशाळेस प्रोत्साहन मिळाले.
कार्यशाळेच्या उद्घाटणाच्या सत्रात अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण
"कार्यशाळेच्या प्रथम सत्रामद्धे आर्थिक साक्षरतेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. ए. जी. सूर्यवंशी""कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामद्धे वैयक्तिक आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. संतोष कांबळे "
"कार्यशाळेच्या तृतीय सत्रामद्धे आर्थिक फसवणूक या विषयावर मार्गदर्शन करताना
श्री नितीन पाटील "