M. Com. Section ✅

 # कॉमर्स  विभागामार्फत ( M. Com. )  New Syllabus of M.Com and Preparation of Project Reports as per National Education Policy 2020 या विषयावर व्याख्यान संपन्न #

     दिनांक 31ऑगस्ट 2024 रोजी एम .कॉम विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने "New Syllabus of M.Com and Preparation of Project Reports as per National Education Policy 2020"या विषयावर गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.के.व्ही. मारुलकर सर(चेअरमन,BOS कॉमर्स शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर) उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा डॉ. एम. ए .शिंदे सर यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.एस.एस.शेवडे यांनी करून दिला. उपस्थित पाहुण्यांचे युगांतराचा अंक देऊन स्वागत करण्यात आले .यानंतर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर. के. शानेदिवाण सर यांनी एम.कॉम विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. के. व्ही.मारुलकर सर यांनी एम.कॉम व बी.कॉम साठी असणाऱ्या प्रोजेक्ट साठी मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना आपला प्रोजेक्ट विषय कसा निवडावा ,घेतलेल्या विषयाच्या संदर्भातील डाटा कसा कलेक्ट करावा, प्रोजेक्ट किती पेजेस चा असावा,त्याचे विश्लेषण कसे करावे व शेवटी निष्कर्ष आणि सूचना कशाप्रकारे द्याव्यात या संदर्भात परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.एस.एच. कांबळे सर आणि IQAC समन्वयक डॉ.आर.डी. मांडणीकर सर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. उज्वला पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे आभार डॉ. सी.के.पाटील यांनी केले यावेळी एम.कॉम आणि बी.कॉम विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच इतर विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.


"स्वागत व प्रास्ताविक करताना डॉ. एम. ए. शिंदे" 

    
"New Syllabus of M.Com and Preparation of Project Reports as per National Education Policy 2020"या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. के. व्ही. मारूलकर 

"अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. आर. के. शानेदिवान" 
                                                   "आभार व्यक्त करताना डॉ. सौ. सी. के. पाटील"