"आर्थिक साक्षरतेवर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अग्रणी कार्यशाळा संपन्न"
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत, न्यू कॉलेज क्लस्टर अंतर्गत, IQAC व वाणिज्य विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर यांचे मार्फत “आर्थिक साक्षरतेद्वारे नागरिकांचे सशक्तिकरण ” या विषयावर एक दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचे औचित्य साधून " *आर्थिक साक्षरता* " या विषयावरती भित्तिपत्रकाचे प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. या भितीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यशाळेची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. कार्यशाळेचे उद्धघाटन महाविद्यालयाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात माननीय प्राचार्य सरांनी आजच्या काळात वित्तीय साक्षरतेची गरज आहे व विद्यार्थ्यांनी वित्तीय बाबींसंदर्भात ज्ञान घेऊन आपले आर्थिक समज वाढवावी असे आवाहन केले.कार्यक्रमासाठी न्यू कॉलेज, लीड कॉलेज क्लस्टरचे चेअरमन डॉ. व्ही. एम. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी IQAC समन्वयक डॉ.आर. डी. मांडणीकर, सह समन्वयक डॉ.ए.बी.बलुगडे तसेच महाविद्यालयामधील प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे आभार कॉमर्स विभागातील प्रा. डॉ. एम. ए. शिंदे यांनी मानले. कार्यशाळा तीन सत्रामध्ये पार पडली यामध्ये पहिल्या सत्रामध्ये न्यू कॉलेज येथील प्राध्यापक डॉ. ए. जी. सूर्यवंशी यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्व यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आर्थिक साक्षरता अर्थ, महत्व त्याचबरोबर बँकांमधील गुंतवणूक त्याचबरोबर बँकांच्या ठेवीचे व कर्जाचे नियोजन कशा पद्धतीने करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. सरांची ओळख डॉ.सी. के. पाटील यांनी करून दिली व आभार प्रा. उत्तम मोरस्कर यांनी मानले. दुसऱ्या सत्राचे साधन व्यक्ती श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यनामध्ये वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन केले, त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये वैयक्तिक आर्थिक नियोजनाचे महत्त्व, गुंतवणुकीचे विविध मार्ग, शेअर मार्केट मधील विविध गुंतवणुकीचे पर्याय, विम्याचे महत्त्व व निवृत्ती नियोजन या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. सरांची ओळख प्रा. सौ. सायली पाटील यांनी करून दिली व आभार प्रा. कुमारी सुमन लोहार यांनी मानले. शेवटच्या सत्राचे साधन व्यक्ती कोल्हापूर मधील गुंतवणूक सल्लागार श्री नितीन पाटील हे होते त्यांनी आपल्या व्याख्यानात आर्थिक फसवणूक म्हणजे काय, आर्थिक फसवणूक कोणकोणत्या मार्गाने होते व या पासून आपला बचाव कसा करावा या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. सरांची ओळख प्रा. सौ. अस्मिता इनामदार यांनी केली व या सत्राचे आभार प्रा. गजानन नाईक यांनी मानले. समारोपाचे सत्र महाविद्यालयातील प्रबंधक श्री रवींद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी कॉमर्स विभागातील प्राध्यापिका डॉ. सी. के. पाटील यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला. यावेळी वेगवेगळ्या महाविद्यालयामधून आलेल्या विद्यार्थी व प्राध्यापक यांनी कार्यशाळे संदर्भात आपला अभिप्राय नोंदवला व कार्यशाळेचा विषय, कार्यशाळेचे नियोजन यासंदर्भात समाधान व्यक्त केले. कार्यशाळेचे आभार प्रा. सौ. उज्वला पाटील यांनी मानले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कॉमर्स विभागातील प्रा. सौ. सौजन्या नागन्नावर, सौ एम
आय. मुजावर व सौ अस्मिता इनामदार यांनी केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष कांबळे यांनी काम पाहिले. ही कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी महाविद्यालयातील सर्वच घटकांचे सहकार्य लाभले. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या कार्यशाळेस प्रोत्साहन मिळाले.
"कार्यशाळेच्या उद्धघाटनाच्या सत्रात अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण"
"कार्यशाळेच्या प्रथम सत्रामद्धे आर्थिक साक्षरतेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. ए. जी. सूर्यवंशी""कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामद्धे वैयक्तिक आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. संतोष कांबळे "
"कार्यशाळेच्या तृतीय सत्रामद्धे आर्थिक फसवणूक या विषयावर मार्गदर्शन करताना
श्री नितीन पाटील "
# वाणिज्य विभागामार्फत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वरती भित्तीपत्रकाचे प्रदर्शन #
दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी वाणिज्य विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्प 2024 या विषयावरती भित्तिपत्रक प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत व केंद्रीय अर्थसंकल्प या अनुषंगाने मार्गदर्शन कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष कांबळे यांनी केले, आपल्या प्रास्ताविकात बजेट म्हणजे काय, बजेट सादर करताना कोणत्या प्रोसेस मधून जाते, यावर्षीच्या अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या तरतुदी, आयकर तरतुदी याचे विवेचन केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी IQAC समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर होते. त्यांनी आपल्या मनोगतात अर्थसंकल्पाच्या संदर्भाने मनोगत व्यक्त केले व यामधील निवडक पोस्टर्स अविष्कार सारख्या स्पर्धेमध्ये पाठवावीत असे मत व्यक्त केले. यानंतर भित्तिपत्रकाचे उद्घाटन IQAC समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर व सह समन्वयक डॉ. ए बी बलूगडे, कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष कांबळे व कॉमर्स विभागातील इतर सहकारी प्राध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बी.कॉम भाग तीन व एम कॉम भाग एक या वर्गातील विद्यार्थ्यांनी बजेट मधील वेगवेगळ्या पैलूंवर तयार केलेल्या 14 पोस्टरचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या समोर केले यामध्ये अर्थसंकल्पातील विविध घटकांसाठी असलेल्या तरतुदी, इन्कम टॅक्स तरतुदी, बजेट म्हणजे काय व प्रकार, कॅपिटल गेन टॅक्स, बजेटमधील महत्त्वाच्या तरतुदी या विषयांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आभार M.com I या वर्गातील विद्यार्थी तेजस कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन M.com I या वर्गातील विद्यार्थिनी मधुबाला मगदूम हिने केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सौ डॉ. सी. के. पाटील, प्रा. सौ. उज्वला पाटील, प्रा. सौ. एम आय. मूजावार व प्रा. सुमन लोहार यांनी केले, यावेळी कॉमर्स विभागातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"स्वागत व प्रास्ताविक करताना प्रा. संतोष कांबळे "
"अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. राहुल मांडणीकर"
"केंद्रीय अर्थसंकल्प 2024 भित्तीपत्रकाचे उद्धघाटण"
"विद्यार्थी पोस्टर प्रदर्शन करताना "
2) # अर्थ निर्मिती कार्यशाळा व सामंजस्य करार-कॉमर्स विभाग #
📌अर्थ निर्मिती( NABCONS), सुनील पतोडिया वेल्फेअर फाउंडेशन पुणे, IQAC व कॉमर्स विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने *" Prevent Yourself from Financial Frauds ( आर्थिक फसवणुकीपासून आपले संरक्षण)* या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन *बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत रूम नंबर 43* मध्ये करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते सुनील पथोडिया वेल्फेअर फाउंडेशन चे कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक *श्री नितीन पाटील* हे लाभले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .के. शानेदिवाण यांनी भूषविले, यावेळी IQAC समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली. यानंतर कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.संतोष कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. यानंतर वृक्षास जलसंजीवनी देऊन कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्राध्यापिका सौ अस्मिता इनामदार यांनी करून दिला, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत युगांतरचा अंक देऊन प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक फसवणुकीचे प्रकार, आर्थिक फसवणूक झाल्यास तक्रार करण्याची योग्य पद्धत, गुंतवणुकीचे विविध मार्ग व त्यामध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करावी, उत्पन्नाच्या प्रमाणात बचत कशी असावी व भविष्यकालीन ध्येय ठेवून वित्त नियोजन कसे करावे या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य सरांनी ऑनलाइन व्यवहार करताना योग्य काळजी घ्यावी नाहीतर आपली फसवणूक होते व यासाठी समाजातील सर्वच घटकांनी आर्थिक बाबींचे योग्य ज्ञान घेतले पाहिजे, यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा वेळोवेळी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आभार कॉमर्स विभागातील प्रा. उत्तम मोरस्कर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सौ उज्वला पाटील व प्रा.डॉ.सी के पाटील यांनी केले. यावेळी नाबार्ड या संस्थेच्या अर्थनिर्मिती या प्रकल्पांतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी *श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय व सुनील पतोडिया वेल्फेअर फाउंडेशन* यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कॉमर्स विभागातील बहुसंख्य विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, इतर विभागातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"स्वागत व प्रास्ताविक करताना प्रा. संतोष कांबळे"
"प्रमुख वक्ते श्री नितिन पाटील मार्गदर्शन करताना"

"अध्यक्षीय मनोगत व्यक्ता करताना प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण "

"श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय व सुनील पतोडिया वेलफेअर फाऊंडेशन सामंज्यस करार"
3) 👉 कॉमर्स फोरम 2024- 25 उद्घाटन 👈
दिनांक 22 जुलै 2024 रोजी वाणिज्य विभागामार्फत कॉमर्स फोरम 2024-25 चा उद्घाटन समारंभ आयोजन करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीकॉम भाग 3 ची विद्यार्थिनी ऋतुजा कुंभार हिने कॉमर्स फोरम म्हणजे काय सांगून त्याची उद्दिष्टे काय आहेत याची माहिती दिली. तसेच बीकॉम भाग 2 ची विद्यार्थिनी फातिमा सय्यद हिने कॉमर्स कॉर्नर विषयी माहिती दिली व कॉमर्स कॉर्नरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून CS सचिन बिडकर सर (चेअरमन,कोल्हापूर चाप्टर ऑफ WIRC ऑफ ICSI) , CS जयदीप पाटील सर(उपाध्यक्ष, कोल्हापूर चाप्टर ऑफ WIRC ऑफ ICSI), अमित कुमार सर(चाप्टर ऑफिस इन्चार्ज) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.एस.एच.कांबळे सर यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कॉमर्स फोरमचे उद्घाटन झाले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.अस्मिता इनामदार यांनी करून दिला. उपस्थित पाहुण्यांचे शहाजी वार्ता आणि युगांतराचा अंक देऊन स्वागत करण्यात आले .यानंतर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर. के. शानेदिवाण सर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलेल्या नवीन बदला संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अधिकचे कष्ट करून कंपनी सचिव यासारखे वेगळे करिअरचे क्षेत्र निवडून आपले करिअर करावे असे आवाहन केले.यानंतर प्रमुख पाहुणे CS सचिन बिडकर सर यांनी विद्यार्थ्यांना CS बद्दल माहिती दिली त्याचबरोबर त्यांनी कॉमर्स मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी देखील सांगितल्या त्यामध्ये बँकिंग, सीए, सी एस तसेच करिअर निवड आत्तापासून करावी व आपले ध्येय ठरवावे तसेच फक्त बीकॉम करून न थांबता एखादा प्रोफेशनल कोर्स करावा असं बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक श्री मनीष भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उज्वला पाटील व डॉ.सी. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. उत्तम मोरस्कर यांनी केले यावेळी कॉमर्स विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच इतर विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉमर्स फोरम 2024-25 उद्घाटन
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण मार्गदर्शन करताना
cs सचिन बीडकर मार्गदर्शन करताना
प्रा संतोष कांबळे मनोगत व्यक्त करताना