Sunday, February 12, 2023

             दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी नऊ वाजता कॉमर्स विभागामार्फत बी कॉम भाग तीन मधील विद्यार्थ्यांनी व्यवसाय नियमन विषयक कायदे या संदर्भात भित्तिपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत आदित्य चौगुले व तेजस डवरी यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के  शानेदिवाण  यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कायद्यासंदर्भात व महिला, बालक या संदर्भातील वेगवेगळ्या  कायद्याविषयी पोस्टर्स तयार करून त्याचे प्रदर्शन सर्वांच्या समोर केले. यानंतर कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे कॉमर्स विभागमार्फत स्वागत केले व कॉमर्स विभागामार्फत राबवले जाणारे कार्यक्रम या संदर्भात माहिती दिली व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण  यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व महिला व बालकांच्या संदर्भातील कायदे सर्वांना माहीत असायला पाहिजेत असे प्रतिपादन केले त्याचबरोबर इतर कायदे सुद्धा विद्यार्थी व समाजातील सर्व घटकांच्या पर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे यावर भर दिला व कॉमर्स विभागातील सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी NAAC समन्वय डॉ. एन एस यांनी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व कार्यक्रमाचे संयोजन कॉमर्स विभागातील प्राध्यापिका Adv. सौ गौरी पाटील व बी कॉम भाग तीन मधील सर्व विद्यार्थ्यांनी केले. यावेळी विभागातील प्राध्यापक महेश धनवडे, डॉ. एम ए शिंदे व बी कॉम मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार समीक्षा परमाज यांनी मानले व सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य चौगुले यांनी केले.
















No comments:

Post a Comment