विद्यार्थी मित्रहो सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता कॉमर्स फोरम उद्घाटन व कंपनी सचिव या क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान होणार आहे. कंपनी सचिव या क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात संधी आहेत, कंपनी सचिव ही पात्रता धारण केल्यास तुम्ही स्वतःचे प्रॅक्टिस करू शकता किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कंपनी सचिव म्हणून काम करू शकता. अजूनही मोठ्या प्रमाणात कंपनी सचिवांची कमतरता आहे. म्हणून आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती मिळावी या उद्देशाने सदरचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. यामध्ये CS सचिन बिडकर व CS जयदीप पाटील मार्गदर्शन करणार आहेत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमास हजर राहावे व कंपनी सचिव या क्षेत्रातील करिअरच्या संधी जाणून घ्याव्यात.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.