@ वाणिज्य विभाग @
दिनांक 04 जुलै 2024 रोजी वाणिज्य विभागामार्फत बी. कॉम. भाग 3 विद्यार्थी समुपदेशन वर्गाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. प्रा. डॉ. राहुल मांडणीकर सर IQAC coordinator यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली . उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे स्वागत प्रा. डॉ. सी. के. पाटील यांनी केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम, कॉलेजच्या असणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, कोर्सेस या संदर्भातील सखोल मार्गदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य सरांनी नवीन शैक्षणिक धोरण, परीक्षा आराखडा या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यासोबतच भविष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे परीक्षण करावे व शिक्षणासोबतच इतर कौशल्य आत्मसात करावी व यातुन आपले भवितव्य उज्वल करून महाविद्यालयाचे नाव मोठे करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका अस्मिता इनामदार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी बीकॉम भाग तीन मधील सर्व विद्यार्थी, कॉमर्स विभागातील इतर सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सी .के. पाटील यांनी केले.
![]() |
| कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे मार्गदर्शन करताना |
![]() |
| प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण मार्गदर्शन करताना |

