Monday, February 6, 2023

Lead College Workshop

      वाणिज्य विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय मार्फत, शिवाजी विद्यापीठ, अग्रणी महाविद्यालय योजना, डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स क्लस्टर अंतर्गत  " *उद्योजकता विकास: आजची गरज"* या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम यशस्वी उद्योजकांची यशोगाथा या विषयावरती भित्तिपत्रकाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. ए. एम. गुरव यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण  यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. ए. एम. गुरव यांच्या शुभहस्ते झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण  हे होते उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक एस एच कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला जली संजीवनी देऊन करण्यात आले यावेळी IQAC समन्वयक डॉ. एन एस जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण  यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला व महाविद्यालयांमध्ये राबविले जाणारे वेगवेगळे उपक्रम यासंदर्भात माहिती दिली व उद्योजकता विकास या विषयाचे सर्व समावेशकता स्पष्ट केली. प्रथम सत्र उद्योजकता विकास या विषयावरती झाले प्रथम सत्राचे साधन व्यक्ती डॉ. ए एम गुरव हे होते त्यांनी उद्योजकता विकास, उद्योगाची नवनवीन क्षेत्रे या संदर्भात मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक एस एच कांबळे यांनी मानले. दुसऱ्या सत्राचे साधन व्यक्ती डॉ. पी. डी. राऊत  हे होते होते त्यांनी स्टार्ट अप इकोसिस्टम यासंदर्भात मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या  व्याख्यानात नवीन संकल्पनेचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे व त्यासाठी शासन, विद्यापीठ कशाप्रकारे साहाय्य करते यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. डी.पी. गावडे यांनी मांडले. तृतीय सत्राचे साधन व्यक्ती प्रसिद्ध उद्योजक शक्ती कश्यप होते त्यांनी आपल्या व्याख्यानात त्यांचे उद्योजकीय वाटचाल स्पष्ट केली व उद्योग  करताना कोणत्या अडचणी येतात व त्यावर ती कशाप्रकारे मात केली पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन केले. समारोपाच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयातील आलेल्या विद्यार्थी, शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त केले. समारोपाच्या सत्राचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण  हे होते व यावेळी कार्यालयीन अधीक्षक मनीष भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार डॉ. एम ए. शिंदे यांनी मांडले व सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महेश धनवडे यांनी केले यावेळी विभागातील प्रा. प्रताप खोत, डॉ. तेजपाल मोहरेकर, प्रा.  सौ. उज्वला पाटील, एडवोकेट सौ गौरी पाटील, प्राध्यापक कृष्णात माळी, यांनी वर्कशॉप संदर्भातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या जबाबदारीने व यशस्वीरित्या पार पाडल्या.

      





No comments:

Post a Comment