** श्री शहाजी महाविद्यालयामद्धे कॉमर्स फेस्टिवल 2026 चे उद्घाटन व वाद-विवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन**
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, आय. क्यू. ए. सी. व कॉमर्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *कॉमर्स फेस्टिवल 2026* चे उद्घाटन तसेच वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी कॉमर्स विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच कॉमर्स फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देत वाद-विवाद स्पर्धेचे शैक्षणिक महत्त्व व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील योगदान अधोरेखित केले. त्यांनी सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते *कॉमर्स फेस्टिवल 2025–26* चे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. वाद-विवाद स्पर्धेमध्ये एकूण १२ गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भारतीय लोकसंख्येचे फायदे व तोटे, ऑनलाइन व्यवहार की ऑफलाइन व्यवहार, स्वदेशी वस्तू की विदेशी वस्तू, नोकरी की व्यवसाय, भारतीय संस्कृती की विदेशी संस्कृती, सोशल मीडियाचे फायदे व तोटे, ग्रामीण जीवन की शहरी जीवन तसेच ऑनलाइन शिक्षण की ऑफलाइन शिक्षण या समकालीन विषयांवर सहभागी गटांनी सखोल व प्रभावी मते मांडली. या कार्यक्रमास आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. वळवी, प्रबंधक श्री रविंद्र भोसले व अधीक्षक श्री मनीष भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. वाद-विवाद स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. शिवाजी रायजादे यांनी आपली जबाबदारी कुशलतेने पार पाडली. स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन प्रा. सौ. अस्मिता इनामदार, प्रा. सौ. उज्वला पाटील, डॉ. सौ. सी. के. पाटील, प्रा. अथर्व कोल्हापुरे, प्रा. नेहा पाटील व प्रा. जी. आय. नाईक यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणादायी प्रोत्साहन लाभले. या प्रसंगी कॉमर्स विभागासह इतर विभागांतील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.