"कॉमर्स विभागामार्फत रिझर्व बँक ऑफ इंडिया मधील करिअरच्या संधी या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन*"
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कॉमर्स विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने *रिझर्व बँक ऑफ इंडिया मधील करिअरच्या संधी* या विषयावर सेमिनारचे आयोजन दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ गीता नायर, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर सौ भाग्यश्री बढे, सौ उर्मिला यादव व बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री मंगेश पवार हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली व कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सौ गीता नायर यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कामकाजाचा आढावा घेतला व RBI अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या विभागांची माहिती दिली व सौ भाग्यश्री बढे यांनी आरबीआय मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली व आरबीआय मध्ये असणाऱ्या सेवा सवलतींची माहिती दिली व विद्यार्थ्यांना रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये उज्वल भवितव्य आहे व विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेऊन या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले . यावे IQAC सहसमन्वयक डॉ. ए बी बलुगडे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के एम देसाई, ग्रंथपाल श्री पांडुरंग पाटील व कॉमर्स विभागातील सर्व प्राध्यापक व महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर . के. शानेदिवान यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सी. के. पाटील यांनी केले, आभार प्रा. सौ. सायली पाटील यांनी मानले व पाहुण्यांची ओळख प्रा. सौ अस्मिता इनामदार यांनी करून दिली.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.